James 3:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपला प्रभु आणि स्वर्गीय पिता याची स्तुति आपण आपल्या जिभेने करतो आणि जे मानव देवाच्या प्रतिमेचे बनविलेले आहेत, त्यांना जिभेने शापही देतो!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपल्या प्रभूची व पित्याची स्तुती करण्यासाठी आपण ती वापरतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना शाप देण्याकरिताही तिचा उपयोग करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या जिभेने आपल्या प्रभू आणि पित्याची आपण स्तुती करतो, आणि याच जिभेने ज्याला परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे बनविले आहे अशा मनुष्यप्राण्याला शाप देतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपण तिचाच उपयोग करून परमेश्वर पित्याचा धन्यवाद करतो; आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण झालेल्या मनुष्यांना तिनेच शाप देतो.