James 4:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नियामशास्त्र देणारा न्यायाधीश फक्त एकच आहे. फक्त देवच तारण करण्यास व नाश करण्यास समर्थ आहे. तू जो तुझ्या शेजाऱ्याचा न्याय करतोस तो तू स्वत:ला कोण समजतोस?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारावयास व नाश करावयास समर्थ आहे. तर आपल्या शेजाऱ्याला दोषी ठरविणारा तू कोण?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारण्यास व न्याय करण्यास समर्थ आहे; तर आपल्या शेजार्यास दोषी ठरवणारा तू कोण?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नियमशास्त्र देणारे आणि न्यायाधीश एकच आहेत, तेच उद्धार आणि नाश करू शकतात. परंतु आपल्या शेजार्याचा न्याय करणारा तू कोण?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो तारण्यास व नष्ट करण्यास समर्थ आहे असा नियमशास्त्र देणारा व न्यायाधीश एकच आहे. मग शेजार्याला दोष लावणारा तू कोण?