James 4:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्हांला काही गोष्टी पाहिजे असतात पण त्या तुम्हांला मिळत नाही, म्हणून तुम्ही खून करता व दुसऱ्या लोकांचा मत्सर करता पण तरीही तुम्हांला पाहिजे ते मिळत नाही. म्हणून तुम्ही भांडण व झगडे करता. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत कारण तुम्ही देवाला मागत नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही इच्छा धरता, तरी तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तेव्हा तुम्ही घात करायला तयार होता. हवे ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही म्हणून तुम्ही भांडणतंटे करता. तुम्ही देवाकडे मागत नाही, म्हणून तुम्हांला मिळत नाही
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हांला प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही; तुम्ही भांडता व लढता; तुम्ही मागत नाही, म्हणून तुम्हांला प्राप्त होत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही इच्छा करता परंतु तुम्हाला प्राप्त होत नाही, यामुळे तुम्ही वध करता. तुम्ही लोभ धरता, परंतु जे पाहिजे ते तुम्हाला प्राप्त होत नाही, यामुळे तुम्ही भांडता आणि लढता. तुमच्याकडे नाही कारण तुम्ही परमेश्वराकडे मागत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही लोभ धरता पण तुम्हास मिळत नाही; तुम्ही घात व हेवा करता, पण तुम्हास मिळवता येत नाही. तुम्ही भांडता व लढाई करता तरी तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही मागत नाही.