James 5:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो त्याचा जीव मरणाच्या दाढेतून सोडवितो. आणि त्याच्या पुष्कळ पापांची क्षमा होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गावरून जो परत फिरवितो तो त्याचा जीव मरणापासून वाचवील व अनेक पापांबद्दल क्षमा मिळवील, हे लक्षात ठेवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव मरणापासून3 वाचवील व ‘पापांची’ रास ‘झाकील’, हे ध्यानात ठेवा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे लक्षात ठेवा, जो कोणी अशा पापी व्यक्तीला त्याच्या अयोग्य मार्गापासून फिरवितो, तो त्याला मरणापासून वाचवेल आणि त्याच्या अनेक पापांवर पांघरूण घालेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो त्याचा जीव मरणापासून तारील व पापांची रास झाकील.