James 5:3 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमच्या सोन्याचांदीवर गंज चढला आहे. त्याच्यावर चढलेला गंज तुमच्याविरुद्ध साक्ष देईल आणि तुमचे शरीर अग्नीसारखे खाऊन टाकील. अशा युगामध्ये तुम्ही तुमचे धन साठवून वेगळे ठेवले आहे, ज्याचा शेवट जवळ आला आहे!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुमचे सोने व तुमचे रुपे ह्यावर गंज चढला आहे. त्यांचा तो गंज तुमच्याविरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल. ह्या शेवटच्या दिवसांत तुम्ही धन साठविले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमचे सोने व तुमचे रुपे ह्यांवर जंग चढला आहे; त्यांचा तो जंग तुमच्याविरुद्ध साक्ष होईल, आणि तो ‘अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल.’ शेवटल्या दिवसासाठी ‘तुम्ही धन साठवले आहे.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमचे सोने आणि चांदी याला गंज चढला आहे. त्यांचे गंजणे तुम्हाविरुद्ध साक्ष देईल आणि अग्नीप्रमाणे तुमचे मांस खाऊन टाकेल. शेवटच्या दिवसासाठी तुम्ही धनाचा साठा करून ठेवला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमचे सोनेचांदी मातीमोल झाले आहे. त्याच्यावर चढलेला थर तुमच्याविरुध्द साक्ष देईल आणि तुमचे शरीर अग्नीसारखे खाऊन टाकील. तुम्ही शेवटल्या दिवसांसाठी धन साठवून ठेवले आहे.