Jeremiah 1:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही काळाने मी उत्तरेकडील राज्यातील सर्व लोकांना बोलवीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या: “त्या देशातील राजे येतील आणि यरुशलेमच्या वेशीजवळ आपली सिहांसने स्थापन करतील. ते शहराच्या तटबंदीवर हल्ला करतील. ते यहूदातील सर्व शहरांवर चढाई करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण पाहा, मी उत्तरेकडल्या राष्ट्रांतील सर्व जाती बोलावत आहे, असे परमेश्वर म्हणतो; ते येऊन यरुशलेमेच्या वेशींपुढे, तिच्या सभोवार असलेल्या सर्व तटांपुढे व यहूदाच्या सर्व नगरांपुढे आपापली सिंहासने स्थापतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी उत्तरेकडील राष्ट्रांच्या सर्व लोकांना आवाहन केले आहे,” असे याहवेह जाहीर करतात. “त्यांचे राजे येतील व त्यांची सिंहासने यरुशलेमच्या प्रवेश व्दारावर स्थापतील. ते तटाच्या सर्व बाजूला व यहूदीयाच्या सर्व नगरांविरुद्ध येतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण परमेश्वर म्हणतो, मी उत्तरेकडील राज्यातील सर्व कुळांना बोलावीन आणि ते येतील, ते प्रत्येक आपापले राजासन यरूशलेमेच्या वेशींच्या प्रवेशाजवळ आणि सभोवती त्याच्या सर्व कोटांच्या समोर व यहूदाच्या सर्व नगरांच्या समोर स्थापन करतील.