Jeremiah 10:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण याकोबचा देव त्या मूर्तीसारखा नाही. त्याने सर्व गोष्टींची निर्मिती केली आणि इस्राएलच्या वंशजांची, स्वत:चे खास लोक म्हणून निवड केली. “सर्वशक्तिमान परमेश्वर” हेच देवाचे नाव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो याकोबाचा वाटा तो त्यांसारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे व इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही. कारण तेच सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, इस्राएलसहित, ते लोक त्यांचे वारस आहेत; सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण देव, याकोबाचा वाटा, त्यांसारखा नाही, कारण तो सर्व गोष्टी घडवणारा आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे.