Jeremiah 10:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मेंढपाळ (नेते) मूर्ख आहेत. ते परमेश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. ते शहाणे नाहीत. त्यामुळे त्यांचे कळप (लोक) इतस्तत: विखरुन हरवले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मेंढपाळ पशुतुल्य झाले आहेत; ते परमेश्वराच्या शोधास लागले नाहीत म्हणून त्यांची कार्यसिद्धी झाली नाही. त्यांचा सर्व कळप विखरून गेला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे मेंढपाळ असमंजस आहेत कारण ते याहवेहचे मार्गदर्शन घेत नाहीत; म्हणून ते समृद्ध होत नाहीत आणि त्यांच्या सर्व कळपांची पांगापांग होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मेंढपाळ मूर्ख झाले आहेत. ते परमेश्वराचा शोध घेत नाहीत. म्हणून त्यांना यश नाही, त्यांचे सर्व कळप विखरले आहेत.