Jeremiah 10:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोठा आवाज ऐका! तो आवाज उत्तरेकडून येत आहे; यहुदातील शहरांचा तो नाश करील. युहदाचे निर्जन वाळवंट होईल. तेथे कोल्ह्यांची वस्ती होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ऐका! अवई ऐका! पाहा, ती येत आहे, उत्तरदेशातून मोठी गर्दी येत आहे. ती यहूदाची नगरे वैराण, कोल्ह्यांची राहण्याची जागा अशी करून सोडील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ऐका! तो अहवाल येत आहे— उत्तरेकडून एक महाभयंकर ध्वनी ऐकू येत आहे! तो यहूदीयाची नगरे निर्जन करेल, तिथे कोल्हे भटकतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बातमीचा अहवाल आला आहे, पाहा! यहूदातील शहरांचा नाश करायला आणि कोल्ह्यांची वस्ती करायला. उत्तरेतून मोठा भूमीकंप येत आहे.