Jeremiah 10:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते लोक तार्शिशहून आणलेल्या चांदीचा आणि उफाजहून आणलेल्या सोन्याचा वापर करुन पुतळे बनवितात. ह्या मूर्ती सुतार आणि सोनार घडवितातत्या मूर्तीवर ते निळ्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे चढवितात ‘शहाणे लोक’ असे ‘देव’ तयार करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तार्शीशाहून आणलेले रुप्याचे पत्रे व उफाजचे सोने ह्यांचे कारागिराने केलेले, सोनाराच्या हाताने घडलेले काम त्या आहेत, त्यांना निळा, जांभळा पोशाख चढवतात; त्या सगळ्या कुशल कारागिरांच्या हातचे काम होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते तार्शीशहून चांदीचे पत्रे आणि उफाजहून सोन्याचे पत्रे आणून कुशल कारागीर व सोनारांकडून मूर्ती घडवून घेतात. मग त्यावर ते निळी व जांभळी वस्त्रे चढवितात— हे सर्व निष्णात कारागिरांनी तयार केलेले असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते लोक तार्शीशाहून ठोकून आणलेली चांदी आणि उफाजहून आणलेले सोने, कारागिराच्या व सोनाराच्या हातचे अशे ते काम आहे. ते निळ्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे चढवितात शहाणे लोक असे देव तयार करतात.