Jeremiah 11:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूदातील व यरुशलेममधील लोक त्या मूर्तीकडे जातील. त्यांची प्रार्थना करुन मदत मागतील ते त्या मूर्तीपुढे धूप जाळतात. पण त्या भयंकर संकटकाळी लोकांना मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाची नगरे व यरुशलेमकर ज्या दैवतांना धूप जाळतात त्यांच्याकडे जाऊन ते आरोळी मारतील; पण संकटसमयी ती त्यांचे रक्षण मुळीच करणार नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदीयातील नगर आणि यरुशलेममधील लोकांनी ज्या अन्य देवतांसमोर धूप जाळला, ते त्यांचा धावा करतील, परंतु त्यांना ते आपत्तीतून सोडवू शकणार नाही. निराशेच्या आपत्तीतून त्यांना सोडवू शकणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदातील शहरे व यरूशलेममधील रहिवासी ज्यांना ते अर्पणे देत असत, आणि धूप जाळीत असत, असे ते त्यांच्या देवांकडे आरोळी करतील, पण त्या भयंकर संकटकाळी लोकांस मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही.