Jeremiah 11:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराबद्दल मी बोलत आहे. त्यांची मिसर देशातून सुटका करताना मी त्यांच्याशी हा करार केला होता. त्या वेळी मिसर देश म्हणजे पुष्कळ संकटांची भूमी होती. लोखंडालाही वितळवू शकणाऱ्या भट्टीप्रमाणे तो देश होता. मी त्या लोकांना सांगितले की तुम्ही माझी आज्ञा पाळलीत, तर तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडी भट्टीतून बाहेर काढले त्या दिवशी हा करार मी त्यांना आज्ञापिला व म्हटले, माझी वाणी ऐका व माझ्या आज्ञेप्रमाणे सगळी वचने पाळा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
‘इजिप्तच्या गुलामगिरीतून, लोखंडी भट्टीतून मी त्यांना सोडवून बाहेर आणले तेव्हा मी त्यांना हे नियम सांगितले होते.’ मी म्हटले ‘माझ्या आज्ञा व मी जे सुचविले ते पालन करा, आणि मग तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा परमेश्वर होईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडाच्या भट्टीतून बाहेर काढून आणले, त्यावेळी मी त्यांना हा करार आज्ञापिला आणि ही वचने आचरनात आणा, तर तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईन.