Jeremiah 12:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, जेव्हा मी तुझ्याशी वाद घालतो, तेव्हा तुझेच म्हणणे बरोबर ठरते. पण काही गोष्टी बरोबर वाटत नाहीत. त्याबद्दल मला तुला विचारावेसे वाटते. दुष्ट लोकच यशस्वी का होतात? तू ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीस, अशांना सुखाचे आयुष्य का मिळते?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वरा, मी तुझ्याशी वाद घालू लागलो तर तू न्यायीच ठरशील; तरी मी तुझ्याशी असा वाद करतो की दुष्टांचा मार्ग का सफल होतो? बेइमानी करणार्या सर्वांना सुखसमाधान का प्राप्त होते?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे याहवेह, मी तुमच्यापुढे जेव्हा निवाड्यासाठी वाद आणतो, तेव्हा तुम्ही मला नेहमी धार्मिकतेने वागविता. तरी देखील मला तुमच्या न्यायनिवाड्याबद्धल बोलू द्या: वाईट माणसे एवढी समृद्ध का असतात? सर्व विश्वासहीन लोक सुखी का असतात?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वरा, मी तुझ्याकडे वादविवाद घेऊन येतो, तू नितीमान ठरतोस, मी निश्चितपणे माझ्या तक्रारीचे कारण तुला सांगितले पाहिजे. दुष्ट लोकच यशस्वी का होतात? सर्व जे अविश्वासू लोक ते यशस्वी आहेत.