Jeremiah 12:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोकांनी गहू पेरला, तर तिथे काटे उगवतील. लोक दमेपर्यंत खूप कष्ट करतील, पण या अफाट मेहनतीचे फळ त्यांना मिळणार नाही. त्यांच्या पिकाबाबत ते खजिल होतील. परमेश्वराच्या कोपामुळे या गोष्टी घडतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी गहू पेरला आणि कापणी काटेर्‍याची केली; त्यांनी कष्ट केले पण काही फायदा झाला नाही; परमेश्वराच्या तीव्र कोपामुळे तुमची आपल्या उपजा-संबंधाने फजिती होईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे लोक गहू पेरतील पण काट्यांची कापणी करतील; ते कष्ट करून स्वतःला झिजवतील, पण त्याचा काही फायदा होणार नाही. कारण याहवेहच्या भयंकर क्रोधामुळे ते लज्जेचे पीक गोळा करतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी गहू पेरला पण काटेरी झाडांची कापणी केली, त्यांनी दमेपर्यंत कष्ट केले, पण काही मिळवले नाही. परमेश्वराच्या कोपामुळे ते त्यांच्या पिकाबाबत लज्जित होतील.”