Jeremiah 12:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“यिर्मया, माणसांबरोबर धावण्याच्या शर्यतीत जर तू दमतोस, तर मग घोड्यांशी तू कशी स्पर्धा करणार? जर तू सुरक्षित ठिकाणी कंटाळलास, तर धोकादायक ठिकाणी काय करशील? यार्देन नदीकिनारी वाढणाऱ्या कंाटेरी झुडुंपात तू काय करशील?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तू पायी चालणार्यांबरोबर धावताना थकलास तर घोडेस्वारांबरोबर कसा टिकशील? शांततेच्या देशात तू निर्भय आहेस पण यार्देनेच्या घोर अरण्यात1 तू काय करशील?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जर माणसांबरोबर तू पायी धावतो आणि तू थकून इतका झिजून गेलास, तर घोड्यांबरोबर तू स्पर्धा कशी करशील? जर सुरक्षित देशात तू अडखळतोस, तर यार्देनेच्या जंगलात तू कसे करशील?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तू “यिर्मया, पायदळाबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले, तर मग घोड्यांबरोबर तू कसा धावशील? जर तू सुरक्षित आणि उघड्या देशात पडतोस तर यार्देन नदीकिनारी वाढणाऱ्या काटेरी झुडुंपात तू काय करशील?