Jeremiah 13:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तू केलेली भयानक कृत्ये पाहिली आहेत. जारांशी हसताना आणि संभोग करताना मी तुला पाहिले आहे. वेश्या बनायचेच तुझ्या मनात दिसते आहे. मी तुला डोंगरकपारीत आणि मैदानात पाहिले आहे. यरुशलेम, हे तुझ्या दृष्टीने वाईट आहे. या घृणास्पद पापें तू किती काळ करणार याचे मला नवल वाटते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझे व्यभिचार, तुझे खिदळणे, तुझ्या जारकर्माचे चाळे, ही तुझी घोर कर्मे मी त्या मैदानातल्या टेकड्यांवर पाहिली आहेत. हे यरुशलेमे, तू हायहाय करणार! तू आपणाला शुद्ध करणार नाहीस काय? असे कोठवर चालणार?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझा व्याभिचार व तुझे ते कामातुरपणे खिंकाळणे, व तुझी निर्लज्ज वेश्यावृत्ती! डोंगरावर आणि शेतात चाललेली तुझी अमंगळ कामे मी बघितली आहेत. हे यरुशलेम, तुला धिक्कार असो! तू केव्हापर्यंत शुद्ध राहणार नाही?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझी जारकर्मे आणि खिदळणे, तुझ्या व्यभिचाराची दुष्टाई ही रानांतल्या डोंगरावर मी पाहिली आहेत, हे यरूशलेमे, तुला हाय! तू स्वच्छ केली जात नाही आहे, असे किती काळ चालणार?