Jeremiah 14:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूदाचे लोक कदाचित् उपवास करुन माझी प्रार्थना करतील. पण ती त्यांची प्रार्थना ऐकणार नाही. जरी त्यांनी मला होमार्पण व धान्यार्पणचा नैवेद्य दाखविला, तरी मी त्या लोकांचा स्वीकार करणार नाही. मी युद्धात यहूदाच्या लोकांचा नाश करीन. अन्न तोडून मी त्यांची उपासमार करीन. भयंकर रोगराई पसरवून मी त्यांना नष्ट करीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते उपोषण करतील तेव्हा मी त्यांची आरोळी ऐकणार नाही; ते होमार्पण व अन्नार्पण मला आणतील ती मी स्वीकारणार नाही; मी तलवारीने, दुष्काळाने व मरीने त्यांचा संहार करीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर ते उपवास करतील, तरी मी त्यांच्या रडण्याकडे मुळीच लक्ष देणार नाही; मला ते होमार्पणे आणि अन्नार्पणे आणतील, मी त्यांचा स्वीकार करणार नाही. याउलट तलवार, दुष्काळ व रोगराई यांनी मी त्यांची परतफेड करेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जरी ते उपवास करतील, तरी मी त्यांचे रडने ऐकणार नाही, आणि जरी ते होमार्पण व धान्यार्पण करतील, त्यामध्ये मी आनंद पावणार नाही. कारण तलवार व दुष्काळ आणि रोगराई यांनी मी त्यांचा नाश करीन.”