Jeremiah 14:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“यिर्मया, यहूदाच्या लोकांना माझा संदेश सांग: ‘माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून आलेत. माझ्या कुमारी मुलीसाठी मी रात्रंदिवस अव्याहतपणे आक्रोश करीन. माझ्या लोकांसाठी मी न थांबता आक्रोश करीन. का? कारण कोणीतरी त्यांच्यावर वार करुन त्यांना चिरडले आहे. ते लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू त्यांना हे वचन सांग, ‘माझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रुधारा वाहोत, त्या न थांबोत; कारण माझ्या लोकांची कुंवार कन्या भयंकर जखम लागून अति छिन्नभिन्न झाली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे वचन तू त्यांना सांग: “ ‘रात्रंदिवस माझ्या नेत्रातून अश्रू वाहू दे मी माझे रडणे थांबविणार नाही; माझे लोक, कुमारी कन्या, तिच्यासाठी, कारण ती जखमांनी घायाळ होऊन तुडविली गेली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे वचन त्यांना सांग: माझ्या डोळ्यांत अश्रू रात्रंदिवस वाहोत, ते थांबू नयेत. कारण माझ्या लोकांच्या कन्येचे पडणे खूप मोठे आहे, तिची जखम मोठी आणि ठीक न होणारी आहे.