Jeremiah 15:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकंाच्या हसण्याखिदळण्यात आणि जल्लोशांत मी कधीच सामील झालो नाही. माझ्यावर तुझा प्रभाव असल्याने मी एकटाच बसून राहिलो. आजूबाजूला असलेल्या दुष्टाईबद्दल तू माझ्यात क्रोध भरलास.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
विनोद करणार्यांच्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही; तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे मी एकान्ती बसलो; कारण तू मला अस्वस्थ केले आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी चैन करण्याऱ्या लोकांमध्ये मुळीच बसलो नाही, त्यांच्यासोबत कधीच आनंद केला नाही; मी एकटाच होतो, कारण तुमचा हात माझ्यावर होता आणि तुम्ही मला त्वेषाने भरले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांच्या आनंदात आणि जल्लोषात मी बसलो नाही. तुझ्या हातामुळे मी एकटाच बसून राहिलो, कारण तू मला क्रोधाने भरले आहे.