Jeremiah 15:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते लोक कदाचित् तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जाऊ?’ तेव्हा तू त्यांना माझा पुढील संदेश दे परमेश्वर म्हणतो, ‘काही लोकांना मी मरणासाठी निवडले आहे, ते मरतीलच. काही लोकांची निवड मी लढाईत मरण्यासाठी केली आहे, त्यांना तसेच मरण येईल. काहीना मी उपासमारीने मरण्यासाठी निवडले आहे; ते अन्नावाचून मरतील. काहीची निवड मी देशोधडीला लावण्यासाठीच केली आहे; त्यांना परदेशात कैदी म्हणून पाठविले जाईल.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते जर तुला म्हणतील, ‘आम्ही कोठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो, “जे मृत्यूसाठी नेमलेले आहेत त्यांनी मृत्यूकडे, जे तलवारीसाठी नेमलेले आहेत त्यांनी तलवारीकडे, जे दुष्काळासाठी नेमलेले आहेत त्यांनी दुष्काळाकडे व जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत त्यांनी बंदिवासात जावे.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जर त्यांनी तुला विचारले, ‘आम्ही कुठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: “ ‘ज्यांना मरणासाठी नेमले आहे, त्यांनी मरणाकडे जावे; तलवारीने ज्यांचा वध व्हावयाचा आहे, त्यांनी तलवारीकडे जावे; उपासमारीने जे मरणार आहेत, त्यांनी दुष्काळाकडे जावे; जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत, त्यांनी बंदिवासात जावे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे होईल की ते तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जावे?’ तेव्हा तू त्यांना सांग, परमेश्वर असे म्हणतो: जे मरणासाठी निवडले आहे, ते मरणासाठी. जे तलवारीसाठी निवडलेले आहेत, ते तलवारीसाठी, जे उपासमारासाठी निवडले आहे; ते उपासमारीसाठी जावोत. आणि जे कैदेसाठी आहेत ते कैदेत जावोत.