Jeremiah 15:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या लोकांना तू काश्याची भिंत वाटशील, एवढा मी तुला बलवान करीन. ते तुझ्याविरुद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करु शकणार नाहीत. का? कारण मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला मदत करीन आणि तुझे रक्षण करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला ह्या लोकांनांबंधाने मी पितळेची मजबूत भिंत करीन; म्हणजे ते तुझ्याबरोबर लढाई करतील, तरी तुझ्यावर वरचढ होणार नाहीत; कारण तुझा बचाव करण्यास व तुला सोडवण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुला या लोकांसाठी भिंत बनवेन, कास्याच्या तटबंदीची भिंत; ते तुझ्याशी युद्ध करतील परंतु ते तुझ्यावर प्रभावी होणार नाहीत, तुला सोडविण्यास व तुझा बचाव करण्यास मी तुझ्यासोबत आहे,” याहवेह असे म्हणतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुला या लोकांसाठी पितळेचा बळकट कोट असा करीन. आणि ते तुझ्याशी लढतील, परंतू तुझ्यावर प्रबल होणार नाहीत, कारण तुला तारायला आणि मुक्त करायला मी तुझ्याजवळ आहे, असे परमेश्वर म्हणतो.