Jeremiah 15:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जे कोणी संहारातून बचावले असतील. त्यांना शत्रू हल्ला करुन आपल्या तलवारींनी ठार मारेल. एखाद्या स्त्रीला जरी सात मुले असतील, तरी ती सर्व मरतील. त्या दु:खाने ती एवढा आक्रांत करील की अशक्त होऊन तिला श्वास घेणे कठीण होईल. ती उदास होईल व गोंधळून जाईल. दु:खाने तिला दिवसा, उजेडीही अंधार पसरल्यासारखे वाटेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सातपुती म्लान झाली आहे; ती प्राण सोडत आहे; भरदिवसा तिचा सूर्य मावळत आहे; ती लज्जित व फजीत होत आहे; त्यांचा अवशेष त्यांच्या वैर्यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन, असे परमेश्वर म्हणतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सात मुलांची माता बेशुद्ध होऊन मृत्युमुखी पडेल. भरदिवसा तिचा सूर्य मावळेल; आता ती अपमानित आणि लज्जित होऊन बसेल. त्यातून वाचलेल्यांना त्यांच्या वैर्यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन,” याहवेहने असे जाहीर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आईचे सात मुलांना जन्म देने वाया जाईल. असतील तरी ती सर्व मरतील. ती धापा टाकेल, दिवस असताही तीचा सूर्य मावळेल. ती लाजवली आणि शरमलेली केली जाईल, कारण मी तिच्यात उरलेले शत्रूंच्या तलवारीला सोपून देईन. परमेश्वर असे म्हणतो.