Jeremiah 16:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा तू त्यांना हे सांगितलेच पाहिजेस, ‘तुमच्या पूर्वजांनी परमेश्वराला अनुसरायचे सोडल्याबद्दल ह्या भयंकर गोष्टी घडतील.’ हा देवाचा संदेश आहे. ‘त्यांनी दैवतांची पूजा केली. तुमच्या पूर्वजांनी माझा त्याग केला आणि माझ्या आदेशांचे पालन करणे सोडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तू त्यांना सांग, ‘परमेश्वर म्हणतो, कारण हेच की तुमच्या पूर्वजांनी माझा त्याग केला, ते अन्य देवांच्या मागे लागले, त्यांनी त्यांची सेवा व भजन केले, त्यांनी मला सोडले, माझे नियमशास्त्र पाळले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्यांना सांग, याहवेह असे म्हणाले, ‘कारण तुमच्या पूर्वजांनी मला सोडले. त्यांनी इतर दैवतांची उपासना केली, त्यांची सेवा केली आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तू त्यांना असे सांग, परमेश्वर असे म्हणतो: कारण तुमच्या पूर्वजांनी मला सोडून अन्य दैवतांच्या मागे गेले आणि त्यांची पूजा केली व त्यांना नमन केले. त्यांनी मला सोडले आणि माझे नियमशास्त्र पाळले नाही.