Jeremiah 16:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“आपल्या वचनाची खात्री देताना लोक म्हणतात ‘परमेश्वराचे अस्तित्व जेवढे खरे आहे, तेवढे आपले वचन पक्के आहे. मिसरच्या भूमीतून इस्राएलच्या लोकांची सुटका त्या परमेश्वरानेच केली आहे.’ पण आता देवाचा असा संदेश आहे, ‘लोक वर म्हटल्याप्रमाणे म्हणणार नाहीत. असा काळ येऊ घातलेला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्यास्तव असे दिवस येत आहेत की, ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना मिसर देशांतून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे कोणी म्हणणार नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तथापि, असे दिवस येत आहेत,” याहवेह असे म्हणतात, “ ‘ज्या याहवेहने इस्राएलांना इजिप्तमधून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे कोणी म्हणणार नाही,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव पाहा! परमेश्वर असे म्हणतो. असे दिवस येत आहेत, ज्यात, ज्याने मिसरच्या भूमीतून इस्राएलाच्या लोकांची सुटका तो परमेश्वर जिवंत आहे. असे लोक आणखी म्हणणार नाही.