Jeremiah 16:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून परमेश्वर म्हणतो, “यिर्मया, ज्या घरी लोक अंत्यसंस्कारानंतर जेवण करीत असतील, त्या घरी तू जाऊ नकोस. तेथे गेलेल्यासाठी शोक वा दु:ख प्रदर्शित करायला जाऊ नकोस. ह्या गोष्टी तू करु नकोस. का? कारण मी माझा आशीर्वाद मागे घेतला आहे. ह्या लोकांबद्दल मला दया वाटणार नाही. मला त्यांच्याबद्दल दु:ख होणार नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण परमेश्वर म्हणतो की: शोक करतात त्या घरात प्रवेश करू नकोस, विलाप करण्यास जाऊ नकोस, त्यांच्याविषयी खेद करू नकोस; कारण ह्या लोकांपासून मी आपली शांती काढून घेतली आहे, कृपा व दयादेखील काढून घेतली आहे, असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण याहवेह असे म्हणतात: “ज्या घरात मयतीचे भोजन होत आहे तिथे प्रवेश करू नको; शोक करू नको किंवा सांत्वना देऊ नको, कारण मी माझे आशीर्वाद, माझे प्रेम आणि माझी दया या लोकांपासून काढून घेतली आहेत.” याहवेहची ही घोषणा आहे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण परमेश्वर असे म्हणतो, ज्या घरी शोक आहे, त्या घरात जाऊ नकोस. विलाप करायला आणि सहानुभूती दाखवायला त्या लोकांजवळ जाऊ नको. कारण या लोकांपासून मी आपली शांती व प्रेमदया व करुणा काढून नेल्या आहेत, असे परमेश्वर म्हणतो.