Jeremiah 16:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“यहूदामध्ये महत्वाचे आणि सामान्य दोघेही मरतील. त्यांचे कोणी दफन करणार नाही. अथवा त्यांच्याबद्दल शोक करणार नाही. कोणीही दाढी करुन वा मुंडन करुन त्यांच्यासाठी शोक प्रदर्शित करणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या देशातील लहानथोर मरतील; कोणी त्यांना पुरणार नाहीत, कोणी त्यांच्याकरता शोक करणार नाहीत, कोणी त्यांच्यामुळे आपल्या शरीरांना घाय करणार नाहीत, त्यांच्यामुळे आपली डोकी भादरणार नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“या राष्ट्रातील थोर आणि लहान सर्व मरतील. त्यांना मूठमाती मिळणार नाही, कोणी त्यांच्यासाठी शोक करणार नाही. प्रथेप्रमाणे दुःखाचे चिन्ह म्हणून ते स्वतःच्या शरीरास दुखापत करणार नाहीत किंवा डोक्याचे मुंडण करणार नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून या देशातील मोठे आणि लहान मरतील. ते पुरले जाणार नाहीत किंवा त्यांच्याबद्दल कोणी शोक करणार नाही. त्यांच्याकरिता कोणी आपल्याला कापून घेणार नाही किंवा आपले केस कापणार नाहीत.