Jeremiah 17:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“यहूदी लोकांची पापे, खोडता येणे शक्य नाही, अशा ठिकाणी लिहिली आहेत. ती लोखंडी लेखणीने दगडावर कोरली आहेत. हिरकणीचे टोक असलेल्या लेखणीने ती पाषाणावर कोरली आहेत. तो पाषाण म्हणजेच त्यांचे ह्दय होय. ती पापे वेदीच्या शिंगांवर कोरली आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“यहूदाचे पातक लोखंडी खचरणीने, हिरकणीच्या टोकाने लिहिले आहे; त्यांच्या हृदयपटावर, त्यांच्या वेद्यांच्या शृंगांवर खोदले आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“त्यांच्या हृदय पटलावर आणि त्यांच्या वेद्यांच्या शिंगावर यहूदीयाचे पाप जणू काही लोखंडी कलमाने एखाद्या हिरकटोकाने कोरलेल्या आहेत,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“यहूदाचे पाप लोखंडी लेखणीने व हिऱ्याच्या टोकाने लिहिलेले आहे. ते त्यांच्या हृदयाच्या पाटीवर आणि वेदीच्या शिंगांवर कोरले आहेत.