Jeremiah 17:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते लोक वाळवंटातील झुडुपाप्रमाणे होत. निर्जन, उष्ण आणि कोरड्या व वाईट जमिनीवरील झुडुपाप्रमाणे ते आहेत. देव किती भले करु शकतो, ह्याची त्या झुडुपाला जाणीव नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो वैराणातल्या झुडपासारखा होईल; व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही; अरण्यातील रुक्ष स्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश ह्यांत तो वस्ती करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो मनुष्य वैराण वाळवंटातील खुरट्या झुडूपासारखा आहे; उन्नतीचे चांगले दिवस त्यांना कधीच दिसणार नाहीत. ते वाळवंटातील उजाड भूमीमध्ये, ज्या क्षारभूमीत जीवन नसेल, तिथे राहतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तो वाळवंटातील झुडुपाप्रमाणे आहे आणि चांगले येईल ते तो पाहणार नाही. तो निर्जन, कोरड्या व बरड जमिनीवर व रहिवासी नसलेल्या जागी वस्ती करीन.