Jeremiah 17:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो माणूस पाण्याजवळ असलेल्या वृक्षाप्रमाणे बळकट होईल. त्या झाडाची मुळे लांब असल्याने त्याला पाणी मिळतेच. उष्ण दिवसांचे त्याला भय नसते. त्याची पाने नेहमीच हिरवी असतात. एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही, तरी त्याला चिंता नसते. त्याला नेहमीच फळे धरतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदीकिनारी पसरील; उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील; अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखे आहेत. त्याची मुळे खोलवर पाण्यात गेलेली असतात. या झाडाला उष्णतेचे भय वाटत नाही; त्याची पाने सदा हिरवी राहतात. अवर्षणाच्या वर्षांची त्याला काळजी वाटत नाही. आणि ते आपली रसाळ फळे देण्याचे कधीच थांबत नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या वृक्षाप्रमाणे तो होईल, ज्याची मुळे प्रवाहाजवळ पसरते, तो हे पाहत नाही की उन्हाची झळ येत आहे, कारण त्याची पाने हिरवीगार राहतात. मग दुष्काळाच्या वर्षाच्या काळात तो चिंताग्रस्त होणार नाही, किंवा तो फळ देण्याचे थांबवणार नाही.”