Jeremiah 18:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी यहूदाच्या लोकांची फाटाफूट करीन. ते त्यांच्या शत्रूंपासून पळ काढतील. पूर्वेकडचा वारा ज्याप्रमाणे सर्व वस्तू दूर उडवून देतो, त्याप्रमाणे मी यहूदातील लोकांना दूर पसरवून देईन. मी त्या लोकांचा नाश करीन. मी त्यांच्या मदतीला येत आहे, असे त्यांना दिसण्याऐवजी, मी त्यांना सोडून जाताना दिसेन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पूर्वेकडील वार्‍याप्रमाणे मी त्यांना शत्रूपुढे विखरीन; त्यांच्या संकटसमयी मी त्यांच्याकडे पाठ करीन, तोंड करणार नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसा पूर्वेकडील वारा धूळ उडवितो, त्याप्रमाणे मी त्यांना त्यांच्या शत्रूंपुढे उडवेन; त्यांच्या दुर्दशेच्या दिवशी मी माझे मुख नव्हे, तर त्यांच्याकडे पाठ फिरवेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्यांना पूर्वेचा वारा उडवतो तसे त्यांच्या वैऱ्यांपुढे उडवीन. त्यांच्या संकटाच्या समयी मी त्यांना मुख दाखवणार नाही तर पाठ दाखवीन.”