Jeremiah 18:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून दुष्काळात त्यांच्या मुलांची उपासमार होऊ देत. त्यांचे शत्रू तलवारीने त्यांचा पराभव करु देत. त्यांच्या बायका वांझ होऊ देत. यहूदातील पुरुषांना मृत्यू येऊ देत. त्यांच्या बायकांना विधवा कर युद्धात तेथील तरुण मारले जाऊ देत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे त्यांचे पुत्र दुष्काळात सापडू दे; त्यांना तलवारीच्या तडाक्यात सापडू दे; त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होवोत, मृत्यू त्यांचे पुरुष ठार करो; त्यांचे तरुण लढाईत तलवारीने पडोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून त्यांच्या मुलांना दुष्काळामध्ये जाऊ द्या; त्यांना तलवारीच्या बलाच्या स्वाधीन करा. त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होऊ द्या; त्यांचे पुरुष मृत्यू पावोत, व त्यांचे तरुण लढाईत तलवारीने मारले जावोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव त्यांच्या मुलांना दुष्काळात सोड, आणि तलवार या कडे त्यांना सोपवून दे. त्यांच्या स्त्रिया वांझ आणि विधवा होवोत, आणि त्यांचे पुरुष मरणाने मारले जावोत, युद्धात तेथील तरुण मारले जावोत.