Jeremiah 19:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या वेळी पुढील गोष्टी सांग: सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, ‘कोणीतरी मातीचे मडके फोडावे त्याप्रमाणे मी यहूदा व यरुशलेमला फोडीन; हे मडके परत जोडता येणार नाही. यहूदाच्या बाबतही असेच होईल. तोफेतमध्ये इतक्या मृतांना पुरण्यात येईल की आणखी प्रेतांना पुरण्यास तेथे जागाच राहणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्यांना सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो कुंभाराच्या मडक्याचा भंग केल्यास ते नीट करता येत नाही, तसे मी ह्या लोकांचा व ह्या नगराचा भंग करीन व पुरण्यास जागा उरणार नाही इतके लोक तोफेत येथे पुरण्यात येतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेहचा तुम्हाला हा संदेश आहे: ज्याप्रमाणे या मडक्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या आहेत व हे मडके जसे पुन्हा नीट करता येणार नाही, त्याप्रमाणेच मी या नगरीच्या लोकांचा चुराडा करेन. तोफेतमध्ये इतक्या प्रेतांना मूठमाती देण्यात येईल की कुठे जागा उरणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि पुढील गोष्टी सांग: सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, जसे त्याने मडके फोडले आणि ते पुन्हा जोडने अशक्य आहे, तसेच मी शहरा सोबत करेन, म्हणजे ते तोफेतमध्ये मृतांना पुरता न येणार, इतक्या प्रेतांना ते तेथे पुरतील.