Jeremiah 19:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
‘यरुशलेममधील घरे तोफेतप्रमाणे अपवित्र होतील. राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. का? कारण लोकांनी त्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि त्यांच्याबद्दल आदर दाखविण्यासाठी हवी अर्पण केले. दैवतांना त्यांनी पेयेही अर्पण केली.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या सर्व घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील सर्व सेनांना धूप जाळला व अन्य देवांना पेयार्पणे अर्पण केली ती यरुशलेमेतील घरे व यहूदाच्या राजांची घरे तोफेताच्या स्थळाप्रमाणे अशुद्ध होतील.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरुशलेममधील घरे व यहूदीयांच्या राजांचे राजवाडे तोफेतासारखे भ्रष्ट करेन—ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील शक्तींना धूप जाळला व इतर दैवतांस पेयार्पणे वाहिली.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
‘यरूशलेममधील घरे आणि यहूदातील राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. कारण त्यांनी आपल्या सर्व विटाळलेल्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि दैवतांना त्यांनी पेयार्पणे केली.”