Jeremiah 19:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हल्ली हिन्नोनच्या दरीला तोफेत म्हणतात. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की अशी वेळ येईल की, हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, त्या वेळी ह्या दरीला लोक कत्तलीची दरी म्हणून ओळखतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्या कारणास्तव ह्या स्थळास तोफेत व बेन-हिन्नोमाचे खोरे म्हणणार नाहीत, तर वधाचे खोरे म्हणतील, असे दिवस येत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह म्हणाले, पाहा, असे दिवस येत आहेत, तेव्हा या खोर्‍याला ‘तोफेत’ किंवा ‘बेन-हिन्नोमचे खोरे’ असे म्हणणार नाहीत, तर ‘कत्तलीचे खोरे’ असे म्हणतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव पाहा! परमेश्वर असे म्हणतो, हल्ली हिन्नोमच्या दरीला तोफेत म्हणतात. पण मी तुम्हास खात्रीपूर्वक सांगतो की अशी वेळ येईल की, या दरीला लोक कत्तलीची दरी म्हणून ओळखतील.