Jeremiah 19:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येथेच मी यहूदातील व यरुशलेममधील रचलेले बेत हाणून पाडीन. त्या लोकांचा शत्रू पाठलाग करतील. मी ह्या ठिकाणी यहूदातील लोकांना तलवारीच्या घावांनी मरु देईन. त्यांची प्रेते गिधाडे व वन्य पशू ह्यांचे भक्ष्य होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या स्थळी यहूदा व यरुशलेम ह्यांची मसलत मी निष्फल करीन; त्यांच्या शत्रूंपुढे त्यांचा जीव घेण्यास टपणार्‍यांच्या हाताने, तलवारीने ते पडतील असे मी करीन; त्यांची प्रेते आकाशांतील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य म्हणून देईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘या ठिकाणी यहूदीया व यरुशलेम यांच्या योजना मी उधळून लावेन. मी त्यांच्या शत्रूच्या समक्ष तलवारीने त्यांचा वध करेन, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात, आणि मी त्यांची प्रेते पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना खावयास देईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येथेच मी यहूदातील व यरूशलेममधील रचलेले बेत हाणून पाडीन. त्यांचा पाठलाग करणाऱ्यांच्या आणि त्यांचा शोध घेणाऱ्यांच्या हाती लागण्याआधी मी त्यांना तलवारीवर पाडून मारुन टाकीन. मग त्यांची प्रेते आकाशातील पक्षी व जंगली पशू ह्यांचे भक्ष्य होईल.