Jeremiah 2:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूदा, मूर्तीमागे धावण्याचे थांबव. त्या दैवतांची लागलेली तहान आता पुरे़. पण तू म्हणतेस, ‘त्याचा काही उपयोग नाही. मी त्यांना सोडू शकत नाही. मला ते दैवत आवडतात. मला त्यांना अनुसरायचे आहे.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपले पाय झिजू देऊ नकोस, आपल्या घशाला कोरड पडू देऊ नकोस; पण तू म्हणालीस, ‘काय उपयोग? काही नाही; मी परक्यांवर प्रेम केले आहे, त्यांच्यामागे मी जाणार.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझे पाय पूर्णपणे खळ्यात उघडे पडेपर्यंत पळू नको, आणि तुझ्या घशाला कोरड पडली आहे. परंतु तू म्हटले, ‘याचा काही उपयोग नाही! मी परकीय दैवतावर प्रेम करतो, आणि मी त्यांचेच अनुसरण करणार.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपल्या पायांना अनवाणी होण्यापासून आणि तुझ्या गळ्याला तृषीत होण्यापासून आवरून धर. पण तू म्हणतेस, आशा नाही, नाही, मी परक्यांवर प्रीती केली आहे आणि मी त्यांच्या मागे जाईलच.