Jeremiah 2:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर असे म्हणतो: “मी तुमच्या पूर्वजांशी न्यायीपणाने वागलो नाही असे तुम्हाला वाटते का? म्हणून ते माझ्यापासून दूर गेले का? त्यांनी कवडी मोलाच्या दैवतांना पूजले व स्वत: कवडीमोल झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर म्हणतो की, “तुमच्या पूर्वजांना माझ्या ठायी असा कोणता अन्याय आढळला की ते माझ्यापासून दूर गेले व शून्याच्या मागे लागून शून्यच झाले?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह असे म्हणतात: “तुमच्या पूर्वजांना माझ्याठायी असा कोणता अन्याय दिसला की ते माझ्यापासून इतके दूर गेले? आणि ते व्यर्थ मूर्तींना अनुसरू लागले, आणि स्वतःही तसेच निरुपयोगी बनले?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर असे म्हणतो: “तुमच्या पूर्वजांना माझ्यामध्ये असे काय चुकीचे आढळले, जे ते माझ्यापासून दूर गेले आणि, कवडी मोल दैवतांच्या मागे जाऊन ते पण स्वत: कवडीमोल झाले?