Jeremiah 20:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने नगरांचा जसा नाश केला, तसाच त्या माणसांचाही होवो. परमेश्वराला त्या नगरांबद्दल अजिबात दया नाही. त्या माणसाला सकाळ दुपार युद्धाचा गदारोळ ऐकू येऊ देत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या नगरांचा विध्वंस करून परमेश्वर अनुताप पावला नाही त्यांच्यासारखा तो मनुष्य होवो; सकाळी आरोळी, दुपारी रणशब्द त्याच्या कानी पडो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहने दयामाया न दाखविता प्राचीन नगरांचा जसा नाश केला, तसाच त्या निरोप्याचाही नाश होवो. सकाळी तो शोकगीते ऐको, व दुपारी रणगर्जना.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने दया न दाखवता नाश केलेल्या शहरांसारखा तो मनुष्य होवो. तो सकाळी मदतीचा शब्द आणि दुपारी युद्धाची गदारोळ ऐको.