Jeremiah 20:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कधी कधी मी स्वत:शीच म्हणतो, “मी परमेश्वराला विसरुन जाईन. मी परमेश्वराच्यायावतीने ह्यापुढे बोलणार नाही.” पण मी असे म्हणताच परमेश्वराचा संदेश माझ्या मनात अग्नीप्रमाणे दाह निर्माण करतो. त्या वेळी, माझ्या हाडांच्या आत आत काही जळत आहे, असे मला वाटते. मी परमेश्वराचा संदेश माझ्या मनात फार वेळ दाबून ठेवू शकत नाही आणि शेवटी तो मनात ठेवणे मला अशक्य होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी म्हणालो, “मी त्याचे नाव काढणार नाही, ह्यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखे जळत होते आणि मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते साधेना.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जर मी म्हटले, “मी त्यांचे शब्द उच्चारणार नाही किंवा त्यांच्या नावाने संदेश देणार नाही,” तर त्यांचे वचन माझ्या अंतःकरणात अग्नीप्रमाणे पेटते, व तो अग्नी माझ्या हाडात बंदिस्त राहतो. तो आतील आत इतःपर दाबून ठेवणे मला असह्य होते. निश्चितच, मी ते करू शकत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर मी असे बोललो, मी परमेश्वराबद्दल आता ह्यापुढे विचार करणार नाही, मी त्याचे नाव ह्यापुढे घोषीत करणार नाही. पण त्याचे वचन माझ्या हृदयात, माझ्या हाडांत आग असल्यासारखे होते. म्हणून मी ते समाविष्ट करण्यास संघर्ष करतो परंतु मी त्यामध्ये सक्षम होत नाही.