Jeremiah 21:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेम, मी तुझ्याविरुद्ध आहे. तू डोंगराच्या शिखरावर बसतेस. तू ह्या दरीच्यावर राणीप्रमाणे बसतेस. तुम्ही, यरुशलेममध्ये राहणारे लोक म्हणता, ‘कोणीही आमच्यावर हल्ला करु शकणार नाही. कोणीही आमच्या भक्कम नगरीत येणार नाही.’ पण परमेश्वराकडून आलेला हा संदेश ऐका:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“परमेश्वर म्हणतो, अगे खोर्‍यातील व पठारावरील रहिवासिनी, पाहा, जे तुम्ही म्हणता की, ‘आमच्यावर कोण चढाई करून येईल, आमच्या वस्तीत येण्याची कोणाची छाती आहे?’ त्या तुमच्याविरुद्ध मी उभा आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे यरुशलेमा, मी तुझ्याविरुद्ध आहे, तुम्ही जे या खोर्‍यावर राहता खडकाळ पठारावरील रहिवासी, याहवेह असे म्हणतात; तुम्ही म्हणता, “आमच्याविरुद्ध कोण येईल? आमच्या वस्ती मध्ये कोण प्रवेश करेल?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खोऱ्यात आणि सपाट जागेतील खडकात राहणाऱ्या, पाहा! परमेश्वर असे म्हणतो, मी तुझ्याविरूद्ध आहे. जे तुम्ही असे म्हणता, आमच्यावर कोण हल्ला करेल? कोणी आमच्या भक्कम नगरीत येणार?