Jeremiah 21:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी स्वत: यहूदाच्या लोकांविरुद्ध म्हणजे तुमच्याविरुद्ध लढेन. मी माझ्या सामर्थ्यवान हाताने तुमच्याशी युद्ध करीन. कारण मी तुमच्यावर फार रागावलो आहे. मी तुमच्याविरुद्ध जोरदार युद्ध करुन माझ्या तुमच्यावरील रागाची तीव्रता सिद्ध करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राग, संताप व क्रोध ह्यांनी भरून, बाहू उभारून, बलवान महाभुजाने तुमच्याशी मी स्वत: लढेन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या अतिक्रोध व भयानक कोपामुळे माझा उगारलेला हात व शक्तिशाली भुजा घेऊन मी स्वतःच तुमच्याविरुद्ध लढणार आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी माझ्या सामर्थ्यवान हाताने, क्रोधाने व रोशाने व मोठ्या कोपाने तुमच्याशी युद्ध करीन.