Jeremiah 21:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जो यरुशलेममध्ये राहील तो लढाईत, उपासमारीने वा भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी यरुशलेमच्या बाहेर जाऊन बाबेलच्या सैन्याला शरण जाईल, तो जागेल. त्या सैन्याने नगरीला वेढा घातला आहे म्हणून नगरीला रसद मिळू शकत नाही. पण जो कोणी नगर सोडून जाईल, त्याचा जीव वाचेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या नगरात जो राहील तो तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरेल; जो बाहेर जाऊन तुम्हांला वेढा घालणार्या खास्द्यांना मिळेल तो जगेल, जिवानिशी सुटेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या नगरात जे कोणी राहतील ते तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरतील. परंतु जे कोणी ज्यांनी तुम्हाला वेढा घातला आहे त्या खास्द्यांच्या सैन्यास समर्पण करतील ते जगतील; त्यांचा जीव वाचेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो या शहरात राहील तो तलवार, उपासमारीने व भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी बाहेर तुम्हास वेढा घातलेल्या खास्द्यांकडे पार निघून जाईल तो वाचेल, आणि त्याचा जीव त्यास लूट असा होईल.