Jeremiah 22:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“यहूदा, तुला सुरक्षित वाटले. पण मी तुला इशारा दिला होता. पण तू माझे ऐकण्याचे नाकारलेस. तू तरुण असल्यापासून अशीच वागत आलीस. तू तरुण असल्यापासून माझ्या आज्ञा पाळल्या नाहीस, यहूदा!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझी सुखसोय असता मी तुझ्याबरोबर बोललो, तेव्हा तू म्हणालीस, ‘मी ऐकणार नाही.’ माझे म्हणणे ऐकू नये ही लहानपणापासून तुला खोड आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हाला सुरक्षित वाटत होते, तेव्हाच मी तुम्हाला सावधगिरीचा इशारा दिला होता, परंतु तुम्ही उत्तर दिले, ‘मी ऐकणार नाही!’ लहानपणापासून तुम्ही असेच आहात; तुम्ही आज्ञापालन केलेच नाही!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू सुरक्षित असता मी तुझ्याशी बोललो, पण तू म्हणालीस, मी ऐकणार नाही. तू तरुण असल्यापासून अशीच वागत आलीस. कारण तू माझी वाणी ऐकली नाहीस.