Jeremiah 22:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोणीतरी फेकून दिलेल्या, फुटक्या भांड्याप्रमाणे कोन्या (यहोयाकीन) आहे. कोणालाही नको असलेल्या भांड्याप्रमाणे तो आहे. यहोयाकीन व त्याची मुले ह्यांना बाहेर का फेकले जाईल? परक्या देशात त्यांना का फेकून देण्यात येईल?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हा कोन्या तुच्छ, फुटक्या पात्रासारखा माणूस आहे काय? तो नापसंत पात्र आहे काय? त्याला व त्याच्या संतानाला माहीत नाही अशा देशात त्यांना का फेकून दिले आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा मनुष्य, कोन्याह, फुटक्या भांड्यासारखा कोणालाही नको असलेली वस्तू नाही का? तो व त्याच्या मुलांना त्यांना माहीत नसलेल्या देशात बंदिवान करून भिरकावून का टाकले गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणीतरी फेकून दिलेल्या, फुटक्या भांड्याप्रमाणे कोन्या हा आहे काय? कोणालाही नको असलेल्या भांड्याप्रमाणे यहोयाकीन आहे काय? तो व त्याची मुले का बाहेर फेकले आहेत? आणि माहीत नाही अश्या परक्या देशात त्यांना का फेकून देण्यात आले?