Jeremiah 23:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“संदेष्टेच काय, पण याजकसुद्धा पापी आहेत. माझ्या मंदिरात दुष्कृत्ये करताना मी त्यांना पाहिले आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“कारण संदेष्टा व याजक हे दोघेही भ्रष्ट आहेत; माझ्या मंदिरातदेखील मला त्यांचे दुष्कर्म दिसून आले आहे, असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याजक व संदेष्टे हे दोघेही देवहीन आहेत; माझ्या मंदिरातही मी त्यांची तिरस्करणीय कृत्ये पाहिली आहेत,” असे याहवेह म्हणतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण संदेष्टेच काय, पण याजकसुद्धा विटाळले आहेत. माझ्या मंदिरात त्यांची दुष्कृत्ये आढळली आहेत, परमेश्वर असे म्हणतो.