Jeremiah 23:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मी माझा संदेश त्यांच्याकडे पाठविण्याचे बंद करीन. मग त्यांची स्थिती अंधारात चालणाऱ्यांसारखी होईल. मी असे केल्यास संदेष्टे व याजक ह्यांच्यासाठी वाट जणू निसरडी होईल. ते त्या अंधारात पडतील मी त्यांच्यावर अरीष्ट आणीन. मी त्यांना शिक्षा करीन.” हा देवाकडून आलेला संदेश आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे अंधारातल्या निसरड्या जागांप्रमाणे त्यांचा मार्ग त्यांना होईल, ते ढकलले जाऊन त्यांत पडतील; कारण मी त्यांच्यावर अरिष्ट, त्यांची खबर घेण्याचा वर्षकाळ आणीन, असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणूनच त्यांचे मार्ग निसरडे होतील; त्यांना अंधारात हद्दपार करण्यात येईल आणि तिथे ते पडतील. ज्या वर्षी त्यांना शिक्षा देईन मी त्यांच्यावर अरिष्टे आणेन.” असे याहवेह म्हणतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव त्यांच्या मार्ग त्यांचा अंधारात निसरड्या मार्गा सारखा होईल. ते खाली ओढले जातील, ते त्यामध्ये पडतील. कारण त्यांच्या शिक्षेच्या वर्षी मी त्यांच्याविरुद्ध अरिष्ट पाठवीन, असे परमेश्वर म्हणतो.