Jeremiah 23:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्वशक्तिमान परमेश्वर संदेष्ट्यांबद्दल म्हणतो, “मी त्या संदेष्ट्यांना शिक्षा करीन. विषमिश्रित अन्न खाण्यासाखी वा जहरमिश्रित पाणी पिण्यासारखी ती शिक्षा असेल. संदेष्ट्यांनी हा आध्यात्मिक आजार आणला व तो सर्व देशात पसरला म्हणून मी त्यांना शिक्षा करीन. हा आजार यरुशलेममधील संदेष्ट्यांकडून आला.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याकरता सेनाधीश परमेश्वर संदेष्ट्याविषयी म्हणतो, “पाहा, मी त्यांना खायला कडूदवणा व प्यायला विष देईन, कारण यरुशलेमेच्या संदेष्ट्यांपासून अधर्म निघून देशभर पसरला आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून सर्वसमर्थ याहवेह संदेष्ट्यांबद्धल असे म्हणतात: “मी त्यांना खावयास कडू दवणा देईन व प्यावयास विषारी पाणी देईन, कारण यरुशलेमच्या संदेष्ट्यांमुळेच देवहीनता देश व्यापून टाकीत आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव सेनाधीश परमेश्वर संदेष्ट्यांबद्दल असे म्हणतो, “मी त्यांना कडू दवणा खावयास देणार आणि विषमिश्रित पाणी पिण्यास देणार.” कारण यरूशलेमेतल्या संदेष्ट्यांकडून अशुद्धपणा निघून सर्व देशात पसरला आहे.