Jeremiah 23:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगतो: “हे संदेष्टे तुम्हाला जे काय सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका. ते तुम्हाला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात. ते दृष्टांन्ताबद्दल बोलतात. पण हे दृष्टांन्त त्यांना माझ्याकडून घडत नाहीत, तर ते त्यांच्या मनाचेच असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्हांला संदेश देणार्या संदेष्ट्यांची वचने ऐकू नका, ते तुम्हांला फसवतात; ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टान्त सांगतात, परमेश्वराच्या मुखातला सांगत नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “हे संदेष्टे जे संदेश तुम्हाला सांगतात ते ऐकू नका; ते तुम्हाला खोट्या आशेने भरून टाकतात. ते त्यांच्या मनाचेच दृष्टान्त सांगतात, त्यांचे शब्द याहवेहच्या मुखातील नाहीत!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “हे संदेष्टे तुम्हास जे काय भविष्य सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांनी तुम्हास भ्रमात पाडले आहे! ते त्यांच्या मनाचेच दृष्टांत सांगतात.