Jeremiah 23:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे संदेष्टे, यहूदाच्या लोकांना माझे विस्मरण व्हावे असा प्रयत्न करीत आहेत. एकमेकांना खोट्या स्वप्नाबद्दल सांगून ते हे करीत आहेत. त्याचे पूर्वज जसे माझे नाव विसरले, तसेच आता ह्या लोकांनी मला विसरावे म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. ह्यांचे पूर्वज मला विसरले आणि त्यांनी खोटे दैवत बआलची पूजा केली,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचे पूर्वज बआलदैवतामुळे माझे नाम विसरले, तसे ते आपली स्वप्ने एकमेकांना सांगून माझ्या लोकांना माझे नाम विसरायला लावतील अशी त्यांची कल्पना आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे पूर्वज बआल दैवताच्या उपासनेमुळे मला विसरले, तसे आपली खोटी स्वप्ने सांगितल्यास माझे लोक मला विसरून जातील असा ते विचार करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे संदेष्टे, ऐकमेकांना खोट्या स्वप्नाबद्दल सांगून माझ्या लोकांस माझ्या नामाचा विसर व्हावा असा प्रयत्न करीत आहेत. जसे ह्यांचे पूर्वज बालामुळे माझे नाव विसरले.