Jeremiah 24:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने मला पुढील गोष्टींचा दृष्टांन्त दिला: परमेश्वराच्या मंदिरासमोर दोन अंजिराच्या टोपल्या व्यवस्थित मांडलेल्या मी पाहिल्या. (बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यकोन्याला कैद करुन नेले, त्यांनंतर हा दृष्टांन्त झाला. यकोन्या हा यहोयाकीम राजाचा मुलगा होता. यकोन्या आणि त्याचे महत्वाचे अधिकारी ह्यांना यरुशलेममधून दूर नेले गेले. त्यांना बाबेलला नेले गेले. नबुखद्नेस्सरने यहूदातील सर्व सुतार व लोहार यांनाही नेले.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहोयाकीम ह्याचा पुत्र यकोन्या जो यहूदाचा राजा त्याला व यहूदाचे सरदार, कारागीर व लोहार ह्यांना नबुखद्रेस्सराने धरून यरुशलेमेतून बाबेलास नेल्यानंतर परमेश्वराने मला हे दाखवले; पाहा, परमेश्वराने मंदिरासमोर अंजिराच्या दोन टोपल्या ठेवल्या होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाबिलोनचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीम याचा पुत्र, यकोन्याह, याच्याबरोबरच यहूदीयाचे अधिपती, निष्णात सुतार व लोहार असे कारागीर यांना यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवासात नेले. या घटनेनंतर याहवेहने यरुशलेम येथील मंदिरासमोर अंजीर भरून ठेवलेल्या दोन टोपल्या मला दाखविल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराच्या मंदिरासमोर दोन अंजिराच्या टोपल्या व्यवस्थित मांडलेल्या मी पाहिल्या. (बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकोन्याला व यहूदाचे सरदार व कारागीर व लोहार कैद करून नेले, यरूशलेममधून बाबेलला नेले)